मुंबई : थंडी येताच ओठ फुटणे, पायाच्या तळव्यांना भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. ओठ फुटू नयेत म्हणून सगळेच लिपबामचा वापर करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहीत आहे हे लिपबाम तुमच्या ओठांसाठी हानिकरक असतात. वारंवार ओठांना लिपबाम लावण्याने नुकसान होते. लिपबामध्ये सुगंधासाठी जे केमिकल वापरले जाते ते ओठांच्या आरोग्यासाठी हानिकरक असते.


लिपबाममध्ये मेंथॉल असल्यास यामुळे अधिक नुकसान होते. नियमितपणे लिपबाम लावणाऱ्यांमध्ये ओठ फुटण्याची समस्या अधिक वाढू शकते. 


तसेच यामुळे अॅलर्जी होण्याचा धोकाही असतो. सुगंधासाठी लिपबाममध्ये जे केमिकल वापरले जाते त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते.