डेस्क जॉब करता करता राहा हेल्दी! पाच टिप्स...
दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता.
मुंबई : दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता.
१. भरपूर पाणी प्या...
सोडा किंवा इतर एनर्जी ड्रिंक्सचं सेवन टाळा. कृत्रिम गोडसरपणाचा अनुभव देणारे हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. कारण, हे केवळ तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढवत नाही तर तुमचे दात, हृदय आणि पाचनतंत्र बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. याऐवजी तुम्ही भरपूर पाणी पिऊन तुम्हाला डिहायड्रेशनपासून दूर राहू शकतात... त्याशिवाय तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते.
२. जंक फूड टाळा
कॅफेटेरियामध्ये जाऊन जंक फूड खाण्याऐवजी पोषणदायक आहाराची निवड करा. घरातूनच बनवून आणलेले पदार्थ बेस्ट... कडधान्य, फळं किंवा काजू-बदाम हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.
३. उभं राहून काम करण्याचा प्रयत्न करा
उभं राहणं हे बसून राहण्यापेक्षा केव्हाही चांगलंच. उभं राहिल्यानं तुम्ही वजन वाढणं आणि लठ्ठपणा यांपासून दूर राहू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील एनर्जी वाढतेच शिवाय अतिरिक्त कॅलरीज वापरास येतात. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो. एखादा फोन कॉल घ्यायचा असेल तर बसून राहण्याऐवजी उभं राहून हा फोन घ्या.
४. च्युईंगम जवळ ठेवा
डेस्कवर काम करता करता तुम्हाला तुमचा श्वास ताजा ठेवायचा असेल तर च्युईंगम चावणं केव्हाही उपयोगी ठरते. २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, च्युईंगम चघळल्यानं तुम्ही सतर्क राहता शिवाय यामुळे तुम्ही तणावापासूनही दूर राहता.
५. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा
पायऱ्यांचा वापर करणं केव्हाही चांगलं... पायऱ्या चढल्यानं तुमचं हृदय फिट राहतं... तसंच पायांच्या मांसपेशीही मजबूत होतात. जॉगिंगमुळे कॅलरीज कमी होतात.