नवी दिल्ली : स्टेम सेल बायोलॉजीच्या भारतीय संशोधकांना सध्या एक विचित्र शोध लागलाय. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचं दूध चारपट जास्त पौष्टिक असतं असं त्यांचं म्हणणं आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.


झुरळाच्या दुधात पॅसिफिक बीटल असतं. त्याचा वापर प्रोटीन सप्लिमेंट म्हणूनही करता येतो. यामुळेच झुरळाची पिल्लं कायम तरूण राहतात. या संशोधनात सहभागी असणाऱ्या सनचारी बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार या दुधात प्रोटीन क्रिस्टल नावाच्या धातूचा समावेश असतो. याचे सेवन केल्याने शरीर बराच काळ सुदृढ राहते. भविष्यात झुरळाच्या दुधाचा उपयोग प्रोटीन सप्लिमेंट म्हणून केला जाईल असे संशोधकांचे म्हणणे आहे.