मुंबई :  मायग्रेन एक गंभीर आजार आहे. मायग्रेनच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी मायग्रेनचा इलाज केला पाहिजे. मायग्रेनच्या रुग्णाला अस्वस्थ करणारी डोके दुखी होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायग्रेन झाल्याने अर्धडोके जोरात दुखू लागते. डोक्याचा डावा भाग किंवा उजवा भाग दुखणे किंवा उलटी येणे. डोके दुखीसोबत शरीरात सुन्नता येते. एक सामान्य परिस्थितीतून तुम्ही एका तणावपूर्ण अवस्थेत जातात. सर्वात प्रथम तुमचे डोके दुखू लागते. 


ब्लडप्रेशर हाय होते आणि कायम असे होत राहते, त्यावेळेस समजा की तुम्हांला मायग्रेनचा त्रास सुरू झाला आहे. 


मायग्रेनपासून वाचण्यासाठी टीप्स 


१)  भरपूर झोप घ्या. कमी झोप घेतल्याने मायग्रेनची समस्या होते. चांगल्या झोपेसाठी शांत वातावरण असले पाहिजे. झोपण्यापूर्वी लाइट बंद करा. रूममध्ये अंधार कायम ठेवा आणि शांत वातावरणात झोपा.


२) रेग्युलर व्यायाम करा. एक्सपर्टनुसार एरोबिक एक्सरसाइज केल्याने मायग्रेनची समस्या दूर होते. दिवसातून तीन वेळा किंवा ४० मिनिटं व्यायाम करणे गरजेचे आहे. 


३) टेम्परेचर थेरपी अप्लाय करा. गर्म आणि थेड शेक तुमच्या डोक्यावर आणि मानेवर घ्या. यासाठी आईस पॅकचा देखील वापर करा. यामुळे दुखणे कमी होऊ शकते. हीटिंग पॅड्स तणावग्रस्त मसल्सला आराम देतात. 


४) कॅफीनयुक्त पेयचा वापर करा. सुरूवातीच्या मायग्रेनच्या अवस्थेत कॅफीनची मात्रा सेवन केल्याने खूप आराम मिळतो. 


५) मायग्रेनमुळे झोप लागत नाही. त्यामुळे झोपेची वेळ पाळा. नियमित झोपणे आणि वेळेवर उठणे हे केल्यास फायदा होतो. दिवसा झोपत असाल तर कमी वेळ झोपा.