मुंबई : अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर नेहमीच्याच... या सगळ्या तक्रारी निर्माण होतात त्या हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे... यावर तुम्ही काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकता. 


१. रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या. 


२. जीऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते... सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा. 


३. कच्ची पपई खाल्लानं तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात. 


४. जास्वंदाचं फुल शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजिस्ट्रॉनला बॅलन्स करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतं. 


५. तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या... यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल. 


६. दररोज द्राक्षांचा रस पिल्यानं तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल. 


७. धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळेही तुमचा त्रास दूर होईल.