COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आपल्या भारतात प्रत्येक ऋतूनुसार खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळ आणि गूळाचे सेवन करतात. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का? थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तीळगूळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 


थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते. 


थंडीमध्ये दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 


तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. 


तीळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पाचनशक्ती वाढते.