मुंबई : आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आंब्यामुळे त्वचे सुंदर आणि चमकदार बनते. तसेच आंब्यांचा गर (पल्प) चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग, सुरकुत्या, ब्लॅकहेड्स हे सर्व नाहीसे होतात. चला मग बघुयात, तुम्ही सौंदर्य खुलवण्यासाठी आंब्याचा कसा उपयोग करू शकाल...


 १. स्क्रब


एक चमचा आंब्याचा गर, मध, त्यात अर्धा चमचा दूध किंवा मिल्क पावडर घालून चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा आणि डोळ्याखालील काळी वर्तुळ साफ होतात आणि चेहऱ्याचा ग्लो वाढतो.


२. फेस पॅक


आंबा खाल्ल्यानंतर आपण आंब्याच्या साली फेकून देतो पण जर त्या साली उन्हात सुकवून त्यात दही घालून फेस पॅक बनवला तर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, काळे डाग मिटून जातील.


३. कच्या आंब्याचा रस


 कच्च्या आंब्याचे तुकडे करुन पाण्यात उकळवायचे आणि ते पाणी रोज चेहऱ्यावर लावायचे किंवा त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुतला तर चेहऱ्यावरचे पिंपल्स दूर व्हायला मदत होते.


४. क्लिन्जर


 एक चमचा गव्हाचं पीठ आणि त्यात आंब्याचा रस घालून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा साफ होण्यास मदत होते.


५. टॅनिंग


कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याची सालं हातावर आणि पायावर घासून त्यावर दुधावरची साय लावायची आणि १५ मिनट थांबून थंड पाण्याने धुवून घ्यायचं... असं केल्याने टॅनिंग दूर होते.