न्यूयॉर्क : जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नव्या संशोधनात ही गोष्ट समोर आलीय. रात्रीच्या वेळी कमी खाण्यानं तुमच्या एकाग्रतेवर आणि सतर्कतेवर सकारात्मक प्रभाव दिसून येतो, असं एका संशोधनादरम्यान समोर आलंय. 


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 


पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक डेव्हिड डिंगेज यांच्या मते, रात्रीच्या वेळी जागणारे वयस्कर जवळपास ५०० कॅलरी वापरतात. आमच्या शोधाद्वारे समजतंय की, रात्रभर जागं राहलं तरीही अति खाण्यापासून दूर राहणारे लोक तणावासारख्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकतात.


काय होतं शोधाचं स्वरुप... 


या शोधादरम्यान २१ ते ५० वर्षांपर्यंतचे ४४ जण सहभागी झाले होते. त्यांना दिवसभरात खूप जेवण आणि पाणी दिलं गेलं... सोबतच त्यांना तीन रात्री केवळ चार तासांचीच झोप दिली गेली. 


चौथ्या रात्री मात्र २० सहभागींना जेवण-पाणी देणं सुरुच ठेवलं गेलं तर इतर लोकांना रात्री १० वाजल्यानंतर केवळ पाणी पिण्याची परवानगी दिली गेली. सोबतच सगळ्यांना सकाळी चार वाजता झोपण्याची परवानगी दिली. 


काय आढळलं या शोधात...


शोधानुसार, रात्री उपवास ठेवणारे सहभागी जास्त स्वस्थ आणि फ्रेश दिसले. तर दुसरीकडे, जास्त खाणारे लोक मात्र सुस्त दिसले तसंच त्यांच्या एकाग्रतेवरही नकारात्मक परिणाम दिसून आला.