मुंबई : आपण दररोज अनेक तास ऑफिसात घालवतो. तिथे आपण अनेक वस्तूंना स्पर्श करतो. यातील अनेक गोष्टींवरील जीवजंतू नकळतपणे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आजार पसरवतात. कोणत्या या वस्तू आहेत ज्या सर्वात जास्त आजार पसरवू शकतात, ते जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिफ्टचं बटण
आजकाल आपल्यातील अनेक जण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतात. बिल्डींगमध्ये वर-खाली ये जा करण्यासाठी उंचच उंच बिल्डींगमध्ये लिफ्टचा वापर केला जातो. त्याच बटणांना अनेक जण स्पर्श करतात. एका संशोधनानुसार लिफ्टच्या बटणावर सार्वजनिक शौचालयांपेक्षा ४० टक्के जास्त किटाणू असतात. 


कॉफी मशीन
ऑफिसात गेल्या गेल्या आपल्यातील अनेकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. पण, हेच कॉफी मशीन शेकडो जण वापरतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि पोटदुखीसारखे अनेक विकार पसरू शकतात. 


ऑफिस डेस्क
तुम्ही तुमचे बसण्याचे टेबल स्वच्छ करता का? कारण, तिथे अनेक जीवाणुंची वाढ होत असते. दुपारचे जेवण, नाश्ताही काही जण त्याच ठिकाणी करतात. त्यामुळे तुमची बसण्याची जागा नेहमी स्वच्छ करत जा. 


की-बोर्ड
आपल्या कॉम्प्युटरचा कीबोर्ड आपण कधीच साफ करत नाही. दिवसातले ५-६ तास आपण आपल्या की बोर्डला स्पर्श करतो. या कीबोर्ड वर यीस्ट सारखे जीवाणू वाढत असतात. म्हणून तो नेहमी निर्जंतुक करत जा. 


डेस्क फोन
तुमच्या ऑफिसातल्या टेबलवरील फोन तुमच्यासोबत अनेक जण वापरतात. फोनवर बोलताना तो तोंडाकडे आणि नाकाकडे नेला जातो. त्यावरील जीवजंतू आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका यामुळे उद्भवू शकतो.