मुंबई : लाईफस्टाईलमधील बदलांमुळे हल्ली आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागल्यात. यातील एक सर्वसाधारण समस्या म्हणजे लठ्ठपणा. हल्लीच्या जमान्यात दोनपैकी एक व्यक्ती या समस्येने ग्रस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक प्रयत्नानंतरही पोटावरची चरबी कमी होत नाही. काही लोक जिममध्ये मोठ्या प्रमाणात घाम गाळतात. मात्र त्यानंतरही काही फायदा होत नाही. यावर उपाय म्हणजे मध. मधाच्या खालील वापराने तुम्ही पोटावरची चरबी कमी करु शकता. 


1. पोट कमी करायचे असल्यास डिनरमध्ये ब्राऊन ब्रेड आणि मधाचा समावेश करा. ब्रेडवर मध लावून खा. यात कॅलरी कमी असतात.
2. कोमट दुधात मध घालून प्यायल्यास यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच त्यासोबतच पोटाची चरबीही कमी होईल.
3. गरम पाण्यात मध आणि लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. 
4. जेवणात मधाचा अधिकाधिक वापर करा. यामुळे खाद्यपदार्थ टेस्टी होईलच त्याचबरोबर शरीरात कमी कॅलरी जातील. 
5. सकाळच्या नाश्त्यात ओट्स आणि मध खाण्यास सुरुवात करा. हा पदार्थ हेल्दी असण्यासोबतच तुमचे पोटही कमी करेल. त्यामुळे नेहमी नाश्त्यात याचे सेवन करा.