मुंबई : हल्ली सांधेदुखी ही सर्वसामान्य समस्या झालीये. सांधेदुखी हा एक असा आजार आहे की, जो शरीराच्या अनेक भागांना जर्जर करतो. साधारणत: हात आणि पायांच्या जोडभागात वेदना होतात. खालील उपायांनी तुम्ही सांधेदुखीपासून मुक्ती मिळवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसाज थेरपी - सांधेदुखीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मसाज थेरपी. यामुळे आखडलेले मसल्स मोकळे होण्यास मदत होते. ज्या ठिकाणी त्रास जाणवतो त्या जागी राईचे, ऑलिव्ह अथवा नारळाचे तेल लावून मसाज करा. 


आईस थेरपी - सांधेदुखीचा त्रास होत असल्यास वेदना होत असेलल्या जागी 15-20 मिनिटे बर्फ लावा. यामुळे वेदना कमी होतात.


हीट थेरपी - सांधेदुखीवर उपचारासाठी तुम्ही हॉट टॉवेलने दुखत असलेल्या जागी मसाज करा. 


औषधे - सांधेदुखीवर आयबुप्रोफेनसारखी औषधेही प्रभावी ठरतात. 


विश्रांती - सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी उपचारासोबत विश्रांती घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.