हे सिंपल ड्रिंक तुम्हाला काही दिवसांत बनवेल स्लिम-ट्रिम
व्यस्त जीवनशैलीचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात आरोग्यावर दिसायला लागलाय. आरोग्यावर जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. वजन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने कमी मात्र होत नाही. मात्र एक असे ड्रिंक आहे जे प्यायल्यास सात दिवसांत तुम्ही तीन किलोपर्यंत वजन कमी करु शकता.
मुंबई : व्यस्त जीवनशैलीचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात आरोग्यावर दिसायला लागलाय. आरोग्यावर जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. वजन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने कमी मात्र होत नाही. मात्र एक असे ड्रिंक आहे जे प्यायल्यास सात दिवसांत तुम्ही तीन किलोपर्यंत वजन कमी करु शकता.
ड्रिक्स बनवण्यासाठीचे साहित्य
२ चमचे मध
१ छोटा चमचा हिरव्या वेलचीची पूड
२५० मिली पाणी
कृती -
पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि वेलची पावडर टाका. थंड झाल्यानंतर पाण्यात मध टाका. गरम पाण्यात मध टाकल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात त्यामुळे गरम पाण्यात टाकू नये. हे पेय रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी घ्या.