मुंबई : थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसांतील कोंडा दूर करण्यासाठी शाम्पूमध्ये चिमूटभर मीठ मिसळा आणि ते स्काल्पवर लावा. जेव्हा केस ओले असतील तेव्हा शाम्पू आणि मिठाचे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. ५ ते १० मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर केस धुवा.


केसांमध्ये मीठ राहू नये यासाठी पुन्हा थोडासा शाम्पू घेऊन केस धुवा. मीठामुळे त्वचेवरील डेड स्कीन दूर होते. शाम्पू हे काम करु शकत नाही. त्यामुळे केस धुताना नेहमी चिमूटभर मीठ शाम्पूमध्ये मिसळून लावा.