मुंबई : थंडीत ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे, पायाला भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. लिप बाम अथव व्हॅसलीनसारखी उत्पादने वापरुन आपण या समस्यांवर तात्पुरता इलाज करु शकतो. मात्र ते उपाय दीर्घकाळ टिकत नाहीत. यासाठी घरगुती उपचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध आणि व्हॅसलीन - थंडीत ओठ फुटल्यास मध आणि व्हॅसलीन अथवा पेट्रोलियम जेली एकत्रित करुन ओठांना लावल्यास ही समस्या उद्भवणार नाही.


कोरफड - फुटलेले ओठ मुलायम करण्यासाठी कोरफडीचा नियमितपणे वापरा.


ऑलिव्ह ऑईल - दिवसातून दोन वेळा ऑलिव्ह ऑईल फुटलेल्या ओठांवर लावल्यास फायदा होतो. 


नारळाचे तेल - नारळाचे तेलही फुटलेल्या ओठांवर प्रभावी उपाय आहे. नारळाच्या तेलात मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिड असतात.