या घरगुती उपायाने 4 दिवसांत तुमची त्वचा उजळेल
प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात.
मुंबई : प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात.
यामुळे त्वचा उजळत नाहीच उलट त्वचेवर साईड इफेक्ट होण्याची शक्यता अधिक असते. मात्र या घरगुती उपायाने तुम्ही काही दिवसांत त्वचा उजळू शकता.
साहित्य - कोरफड, गुलाबपाणी, ऑलिव्ह ऑईल, चंदन पावडर, लिंबाचा रस
कृती - एका बाऊलमध्ये एक चमचा चंदन पावडर घ्या. त्यात तीन चमचे गुलाबजल मिसळा. त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस टाकून पेस्ट एकत्रित करा. त्यानंतर एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि तीन चमचे कोरफडीचा गर टाकून चांगले एकजीव करा. तुमची फेअरनेस क्रीम तयार आहे. एका डबीत ही क्रीम भरुन ठेवा आणि ही डबी नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. अधिक चांगल्या फायद्यासाठी दिवसातून दोन वेळा या क्रीमचा वापर करा.