मुंबई : खाण्यापिण्याच्या सवयी, बाहेरच्या अधिक खाणे ही वजन वाढण्याची कारणे मानली जातात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की लग्नानंतरही वजन वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या संशोधनामध्ये लग्नानंतर अनेक जोडप्यांचे वजन वाढल्याचे दिसून आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर जीवन बदलते असं ऐकायला मिळंतं. मात्र शरीरातही इतका मोठा बदल कसा काय होतो. अनेकांना हा प्रश्न असतो की लग्नानंतरच वजन कसे काय वाढते. एका संशोधनानुसार लाईफ स्टाईलमध्ये बदल हे वजन वाढण्याचे कारण असू शकते असे समोर आलेय. 


संशोधनानुसार, सिंगल्सच्या तुलनेत लग्न झालेले जोडपी ऑर्गेनिक आणि ट्रेड फूडच्या खरेदीवर भर देतात. युनिर्व्हसिटी ऑफ बेसलमध्ये हेल्थ सायकॉलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर जुट्टा माटा यांच्या मते, दीर्घकाळ नात्यात असणाऱ्या व्यक्ती खाण्यापिण्याच्या बाबतीत सजग असतात. 


जगभरात लग्न झालेल्यांचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स अधिक असतो. लग्नसोहळ्यादरम्यान जे कार्यक्रम असतात त्याचवेळी त्यांच्या वजनात दोन किलोंनी वाढ होते. 


लग्न झालेली जोडपी सिंगल लोकांच्या तुलनेत चांगले आणि हेल्दी जेवण जेवण्यावर भर देतात. ही जोडपी एकमेकांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात.