मुंबई : तुम्हाला जर वाटत असेल की केवळ लठ्ठ असण्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तर असे नाहीये. तुमचे पोट वाढले असेल त्याचबरोबर तुमचे वयसुद्धा जास्त असेल तरीही हृदयविकाराची शक्यता अधिक असल्याचे एका अभ्यासातून समोर आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या एकूण वजनाचा आणि तुमच्या कंबरेच्या घेराचा हृदयविकारासंबंधी समस्यांशी थेट संबंध असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. जर तुमच्या कंबरेचा घेर १० सेंटिमीटरने वाढला तर हृदयविकाराची शक्यता २९ टक्क्यांनी वाढते. यासाठी त्यांनी ३,६०,००० लोकांचे परिक्षण केले.


व्यक्तीचे वजन जर आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्यामुळे हृदयविकाराचा धोका ३५ टक्क्यांनी वाढतो असे या अध्ययनातून पुढे आल्याचे नॉर्वेजियन युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीमधील एका संशोधकाने सांगितले.


शरीराची कंबर आणि पार्श्वभाग यांचा आकार जितका जास्त तितका हृदयविकाराचा धोकाही जास्त असू शकतो, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. हृद्यविकाराचा धोका कमी कऱण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.