कपडे न घालता झोपल्याने होतात अनेक फायदे
रात्री अंगावर कपडे न ठेवता झोपणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ऐकून तुम्ही हैराण झालात ना. मात्र हे खरंय. हे आहेत कपडे न घालता झोपण्याचे अनेक फायदे
मुंबई : रात्री अंगावर कपडे न ठेवता झोपणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ऐकून तुम्ही हैराण झालात ना. मात्र हे खरंय. हे आहेत कपडे न घालता झोपण्याचे अनेक फायदे
२०१४मध्ये यूएसच्या कोटन कंपनीने केलेल्या रिसर्चमध्ये असे आढळले की ५७ टक्के लोक रात्री न्यूड होऊन झोपतात ते आपल्या रिलेशनशिपमध्ये आनंदी असतात.
जे लोक कपडे न घालता झोपतात त्यांना डायबेटिस होण्याची शक्यता कमी असते. यापाठीमागेही लॉजिक आहे. बेडरूममधील तापमानाचा परिणाम तुमच्या बॉ़डी फॅटवर होत असतो. यामुळे रात्री संपूर्ण कपडे काढून झोपल्याने डायबेटिस होण्याची शक्यता कमी असते.
त्वचेला श्वास घेण्याची गरज असते. अशामध्ये जर महिलांनी घट्ट कपडे अंगावर बाळगल्यास त्यांना त्वचेचे इन्फेक्शन होण्याची भिती असते. कपडे न घातल्याने झोपल्याने झोपही चांगली येते.
प्रतिकारकक्षमता सुधारते. एका रिपोर्टनुसार, न्यूड झोपल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल कमी प्रमाणात रिलीज होते. तसेच त्वचेचा त्वचेशी संपर्क झाल्याने ऑक्सीटॉक्सिनची मात्रा कमी होते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि प्रतिकारकक्षमता चांगली राहते.