जम्मू-काश्मीरमध्ये करणार 10 हजार स्पेशल पोलिसांची भर्ती
जम्मू-कश्मीरमध्ये 10 हजार विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत चाललेली अशांती आणि हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत मान्यता देखील पाठवली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमध्ये 10 हजार विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत चाललेली अशांती आणि हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत मान्यता देखील पाठवली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपिया हे भाग अतिशय अशांत मानले जाताता. येथे मोठ्या प्रमाणात हिंसा होतो. या भागातून जवळपास 5 हजार युवकांनी पोलीस भर्तीमध्ये भाग घेतला.