रायपूर : छत्तीसगडमध्ये  आज पंतप्रधान मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान १०४ वर्षांच्या आजीबाईंचे पाय धरले. पंतप्रधान मोदींचं देशभरात शौचालय उभं करण्याचं स्वप्न आहे. २०१९ पर्यंत स्वच्छ भारत हे मोदींचं ध्येय आहे. याचीच पूर्तता करण्याचा प्रयत्न या आजींनी केल्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे पाय धरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याजवळच्या शेळ्या विकून या आजींनी शौचालय बांधले. त्यांनी केलेल्या या कामाचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धरून नमस्कार केला. धामतारी जिल्ह्यात राहणाऱ्या कुंवर बाईंनी आपल्या जवळच्या शेळ्या विकून २२ हजार रुपये जमा केले आणि त्यातून शौचालय बांधले.


पाहा व्हिडिओ