सुकमा : छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत 11 जवान शहीद झाले. सीआरपीएफवर अचानक नक्षवाद्यांनी हल्ला केला. सुमकमामध्ये नक्षलवादी जवानांचे हत्यारं देखील घेऊन फरार झाले. चिंतागुफाजवळ बुर्कापालमध्ये नक्षलवाद्यांनी रोड ओपनिंग पार्टीवर घात लावून हल्ला केला.


दुपारी दीड वाजता जवानांवर हा हल्ला झाला. सीआरपीएफच्या 74व्या बटालियन रोड ओपनिंगसाठी निघाली होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जवानांवर फायरिंग देखील केली. इतर जवानांनी फायरिंग करत नक्षलवाद्यांना उत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी बराच वेळ चकमक सुरु होती.