मुंबई : रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेने यावर म्हटलं आहे, झटपट पैसे काढण्यासाठी एटीएम आपली सर्वात मोठी पसंती झाली आहे, मात्र सध्या बरेचसे बँक ग्राहक बँकिंग व्यवहारासाठी थेट बँकेच्या शाखेत जाण्याऐवजी एटीएमलाच पसंती देतात. त्यामुळे बँकांवरील कामाचा ताणही कमी झालाय, शिवाय ग्राहकांचीही सोय झालीय. तरीही मोठ्या प्रमाणात बँक एटीएम खराब असणं व्यापक विकासाला घातक आहे.


एटीएमच्या दुरूस्तीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशाराही रिझर्व बँकेचे उपगव्हर्नर एसएस मुंद्रा यांनी दिलाय. ज्या ज्या बँकाची एटीएम खराब किंवा नादुरूस्त आहेत, त्यांनी ती तातडीने दुरूस्त करावीत असं आवाहनही रिझर्व बँकेने केलंय.