नवी दिल्ली : नोटंबदीनंतर देशातील ५० बँकामध्ये काळापैसा मोठ्या प्रमाणात पांढरा केला गेल्याची ईडीला शंका आहे. ज्यामध्ये देशातील १० मुख्य बँकांचा समावेश आहे. यासाठी निष्क्रिय आणि नव्या खात्यांचा वापर केला गेला. १३ सहकारी बँकेने एका कामर्शियल बँकेत जवळपास १६०० कोटी रुपये जमा केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरतमध्ये एका सहकारी बँकेने बँक ऑफ बडोदासोबत त्यांच्या बंद झालेल्या खात्यात २० कोटी जमा केले. ईडी १४ बँकांमधील जवळपास ३०० कोटी रुपयांची मनी लाँड्रिंगच्या अतंर्गत चौकशी करत आहे.


ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार ऑडिटमध्ये माहिती समोर आली आहे की, १३ सहकारी बँकांनी आयसीआयसीआय बँकंच्या बीकेसी ब्रांचमध्ये १६ आणि २१ नोव्हेंरमध्ये बंद झालेल्या खात्यात १५९६ कोटी जमा केले.


५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर आरबीआयने सहकारी बँकांना जुन्या नोटा जमा करण्यास परवानगी दिली नव्हती.