नवी दिल्ली : देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्याची दुकाने हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे 1 मेपासून राज्यातील महामार्गावरील १३ हजार बिअर बारचं शटर डाऊन होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भातलं पत्रक राज्याच्या अबकारी खात्याने काढले आहे. राज्य सरकार महामार्गालगतच्या कोणत्याही नव्या बारला परवानगी देणार नसल्याचे या आदेशात नमूद करण्यात आलंय.. तर याआधी महामार्गालगत सुरु असलेल्या बिअर बारचा परवाना मे २०१७ पर्यत वैध राहणार आहे. यानंतर परवान्याचं नुतनीकरण करण्यात येणार नसल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलंय. 


१ एप्रिलपर्यंत महामार्गालगतची मद्याची दुकानं हटवण्यात यावीत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.. दुकान मालकांना मुभा देत जोवर परवाना आहे तोपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ३१ मार्चनंतर परवान्याचं नुतनीकरण करण्यात येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून दारुची दुकानं किमान ५०० मीटर अंतरावर असावीत असे न्यायालयाने सांगितलंय. शिवाय दारुची बॅनर्स आणि जाहिराती हटवण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत.