नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचाऱ्यांना तसेच ५८ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कर्मचाऱ्यांच्या वाहनभत्त्यात २ ते ४ टक्क्यांची वाढ होणार आहे. सरकार यासंबंधीची घोषणा या महिन्यात करेल अशी शक्यता आहे. 


दरम्यान कर्मचारी संघटना मात्र या प्रस्तावित वाढीने नाखुश आहेत. महागाई ज्या वेगाने वाढतेय त्याचा विचार करता ही वाढ कमी असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. 


केंद्रीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केकेएन कुट्टींच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने १ जानेवारीपासून महागाई भत्त्यात २ टक्के वाढीसाठी संमती दर्शवली होती.


देशातील मूलभूत वस्तू आणि सेवा यांच्या वाढत्या किमतींच्या हिशोबात महागाई भत्ता ठरतो. वर्षातल्या १२ महिन्यांच्या महागाई दराच्या सरासरीनुसार महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ वेतनावर ही वाढ मिळते.