गुलबर्गा : कर्नाटकमधल्या गुलबर्गा शहरात दोन वर्षांचं बाळ वॉशिंग मशीनमध्ये अडकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरात कुणाचं लक्ष नसताना नवीनच आणलेल्या वॉशिंग मशीनवर हे बाळ चढलं आणि मशीनमध्ये पडलं. मशीनमध्ये काही काळ खेळल्यानंतर मशीनची लॉकिंग यंत्रणाही बिघडली. त्यामुळं हे बाळ मशीनमध्येच अडकून पडलं.


कुटुंबियांनी प्रयत्न करूनही मशीनचं दारच उघडता येत नव्हतं. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी मशीनचं दार तोडून या बाळाला बाहेर काढलं.