गोव्यात 20 वर्षीय तरुणीला जिवंत जाळले
गोव्यात अंदाजे अठरा ते वीस वर्षांच्या मुलीला जिवंत जाळून ठार मारल्याचं उघडकीस आलंय. गुरूवारी मध्यरात्री किंवा पहाटे ही घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पणजी : गोव्यात अंदाजे अठरा ते वीस वर्षांच्या मुलीला जिवंत जाळून ठार मारल्याचं उघडकीस आलंय. गुरूवारी मध्यरात्री किंवा पहाटे ही घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
संबंधित तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. ही मुलगी अल्पवयीन असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे शिवोली गावातील बामणवाडा इथं खुल्या मैदानात या मुलीला जाळण्यात आलंय.
मैदानात मुलीला फरपटत नेल्याच्या खाणा-खुणा दिसतात. तसेच घटनास्थळी लाईटर सापडलेला आहे. मुलीला जाळण्यासाठी कसला वापर केला हे मात्र समजू शककेलं नाही.मृत तरुणीच्या मृतदेहाचे काही अवशेष कुत्र्यांनी खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेलेत. याप्रकरणी हणजूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधीक तपास करत आहेत.