नवी दिल्ली : 2000 रुपयांची नोट आल्यानंतर त्याबाबत अनेकांमध्ये उत्सूकता दिसून आली. भारतात या २००० च्या नव्या नोटेची चांगलीच चर्चा आहे. २००० ची नोट ही त्याच्या रंगामुळे अधिक चर्चेत आहे. गुलाबी रंगाची २००० ची नोट ही सध्या सेल्फीचं कारण बनली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश-विदेशातील मुद्रा संग्रहणालयात मनोज जैन आदिनाथ यांच्या कलेक्शनमध्ये एक बांग्लादेशची नोट सापडली आहे. ज्याचा रंग गुलाबी आहे आणि २००० च्या नव्या नोटाशी ती मिळती-जुळती वाटते आहे. ही नोट १० टक्काची आहे. पण आकाराने ती २००० च्या नोटेपेक्षा लहान आहे.


पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता अचानक ५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यानंतर देशभरात मोठी खळबळ माजली होती.