सर्वात मोठी कामगिरी, चकमकीत २१ माओवादी ठार
आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर मलकागिरी वनक्षेत्रात सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंड दल आणि ओडिशा पोलिस यांची माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत २१ माओवादी ठार झाले.
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर मलकागिरी वनक्षेत्रात सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंड दल आणि ओडिशा पोलिस यांची माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत २१ माओवादी ठार झाले.
एक वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये माओवाद्यांचा एक मोठा नेता आण एका मोठ्या नेत्याचा मुलाचा समावेश आहे.
चकमकीची बातमी कळताच आंध्रप्रदेशचे पोलिस महासंचालक नंदुरी संबाशिव राव तात्काळ विशाखापट्टणमच्या जिऊ रवाना झाले असून त्यांनी माओवादी ठार झाल्याचे कन्फर्म केले.
ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात रामगुरहामध्ये दोन राज्यांच्या पोलीस नियमीत सर्च ऑपरेश करत असतात. असे एक ऑपरेशन सुरू असताना ही चकमक झाली यात माओवादी विरोधी विशिष्ट दल ग्रेहाउंडचे दोन कॉन्स्टेबल जखमी झाले.
सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये एकतास चकमक झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून पोलिसांनी चार एके-४७ रायफल जप्त केल्या.