पाटणा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४वर
गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २४वर पोहोचलीये.
पाटणा : गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २४वर पोहोचलीये.
काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली होती. या बोटीमध्ये ४० प्रवासी होती. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीत असल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसतेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केलीये.
याप्रकरणी बोट चालवणाऱ्याविरोधात सोनपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. रविवारी सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरु करण्यात आलेय. एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी शोधकार्य करतायत.