वाराणसी, उत्तर प्रदेश : वाराणसीच्या राजघाट पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमधील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. बाबा जय गुरुदेव यांच्या कार्यक्रमा दरम्यानही दुर्घटना घडली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलेय. तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हराजारांची मदत जाहीर केलेय. 


गंगा नदीच्या किनाऱ्यावर राजघाट पुल आहे. या पुलावरुन शोभायात्रेची मिरवणूक जात होती. मात्र, मोठ्याप्रमाणात पुलावर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या कार्यक्रमासाठी तीन हजार लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेण्यात आली होती. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त गर्दी जमा झाली होती. यावेळी चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत.
 
बाबा जय गुरुदेव यांचा हा कार्यक्रम दोन दिवस आहे. पुलावरुन मिरवणूक सुरु असताना मोठी गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनास्थळी चप्पल आणि पिशव्यांचा खच दिसत आहे.