मुंबई : भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मोदींच्या या मास्टरस्ट्रोकचं सगळीकडून कौतुक होत असतानाच या निर्णयाचा फटका खुद्द मोदींनाच बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ नोव्हेंबरला मोदींनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर नऊ तारखेला ट्विटरवरून तब्बल तीन लाख लोकांनी मोदींना अनफॉलो केलं आहे. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठ दिवसात मोदींना 25 हजार जणांनी फॉलो केलं तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर मोदींना तब्बल 50 हजार जणांनी फॉलो केलं होतं.


ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या यादी असणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदींनंतर या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नंबर लागतो. जगातल्या प्रसिद्ध ट्विटर यूझर्समध्ये मोदी 47 व्या क्रमांकावर आहेत.