पाटणा : बिहारमध्ये वीज कोसळल्याने ४६ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर २५ जण जखमी आहेत. बिहारमध्ये मॉन्सून दाखल झालाय. हा आकडा मागील एक ते दोन दिवसांचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा सर्वाधिक आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रूपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.


बिहारचं शेजारील राज्य झारखंड राज्यामध्येही वीज कोसळल्यामुळे ५ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.  बिहारमधील मृत झालेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.