नवी दिल्ली : 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर केवळ चार तासातच देशाचे 15 लाख कोटी रुपयांचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवार मध्यरात्रीपासून चलनातील 500  आणि 1000 रूपयांच्या नोटा रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर चार तासात देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आला. 5 लाख कोटी रुपयांचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर गेले.  


चलनाचा हा आकडा एकूण चलनाच्या 87 टक्के इतका आहे. म्हणजेच पुढचे काही दिवस देशाचे अर्थव्यवहार 13 टक्के चलनावर सुरू राहणार आहेत. सध्या 500 रूपयांच्या 1650 कोटी नोटा चलनात आहेत याचाच अर्थ या नोटांच्या रूपाने 8.25 लाख कोटी रूपये चलनात आहेत. तसेच 1 हजार रूपयांच्या 670 कोटी नोटा म्हणजे 6,70 लाख कोटी रूपये चलनात आहेत. त्या सर्व नोटा आता बाद ठरल्या आहेत. 


कधी अशा नोटा रद्द झाल्या होत्या?


- यापूर्वीही 1946 आणि 1978 मध्ये असे निर्णय घेतले गेले आहेत.
- 10 हजार रूपये मूल्याची नोट देशात प्रथम 1938 मध्ये आणि त्यानंतर 1954 मध्ये छापल्या गेल्या होत्या. त्या अनुक्रमे जानेवारी 1946 आणि जानेवारी 1978 साली बंद केल्या गेल्या.
- 500 रूपयांची नोट 1987 मध्ये चलनात आणली गेली होती.