शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पोटातून काढले ४० रामपूरी चाकू!
येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या सुरजित सिंग याच्या पोटातून शस्रक्रिया करुन तब्बल ४० रामपूरी चाकू बाहेर काढण्यात आलेत.
अमृतसर : येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या सुरजित सिंग याच्या पोटातून शस्रक्रिया करुन तब्बल ४० रामपूरी चाकू बाहेर काढण्यात आलेत.
सुरजित सिंग हे दोन महिन्यांपासून चाकू खात होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पाच डॉक्टरांनी तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही शस्रक्रिया यशस्वी केली. शस्रक्रिया करणाऱ्या डॉ. जितेंद्र मल्होत्रा यांनी माझ्या कारकिर्दीतील भयानक शस्रक्रिया असल्याचे सांगितले. शस्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.