मुंबई : अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यात एकूम ७९ जाहिरातींपैकी ४२ जाहिरातींकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रारी योग्य ठरविले आहे.  यात स्नॅपडील, ओएलएक्स, ऊबर, भारती एअरटेल, कोलगेट इत्यादी उत्पादनांच्या जाहिरातींचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाच्या मते यात ग्राहकांनी केलेल्या तक्रारींनुसार या ४२ जाहिरातींपैकी आठ जाहिराती आरोग्याविषयी, नऊ शैक्षणिक विषयांसंबंधी, व्यापारासंबंधी सात तर दूरसंचार क्षेत्रासंबंधी १५ जाहिरातींचा समावेश आहे. 


यात आता या संस्थेने या जाहिरातींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.