पंजाब: पातियाळा रस्त्यावर भवानीगड येथील चार जणांना साडेचार लाखाच्या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा शंभर आणि दोन हजारांच्या आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चार आरोपींची टोळी बनावट नोटा बनवून संगरूरमधील सहा जणांना पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

आरोपी हरभजन दास, जसबीरसिंग, जयदेव आणि भगवान दास यांच्याकडून पोलिसांनी शंभर आणि दोन हजारच्या साडे चार लाखांच्या नोटासह प्रिंटर, स्कॅनर, कॉम्प्यूटर आणि मोटार जप्त केले आहे.