मुंबई : देशात नोटबंदी लागू होऊन एक महिना झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काही जण याच्या विरोधात बोलत आहे. ब्रिक्स बँकेचे प्रमुख आणि माजी भारतीय बँकर केवी कामथ यांनी दावा केला आहे की, यामुळे सरकार, अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाला फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीचे 5 फायदे -


1. भ्रष्टाचारावर लगाम


देशात 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर अनेकांचा पैसा बाहेर आला. देशाची एकूण पैशाच्या 85 टक्के भाग हा 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये होता. काळा पैसा देखील यामध्येच अनेकांनी साठवून ठेवला होता. भ्रष्टाचारासाठी देखील याच नोटांचा अधिक वापर केला जात होता.


2. कॅशलेस अर्थव्यवस्था


कॅशलेस इकोनॉमी बनवण्यासाठी गरजेचं आहे की, देशात जास्तीत जास्त व्यवहार हे कॅशलेस असावेत. यामुळे रोख रक्कमेवर अवलंबून असलेला व्यवहार कमी होईल आणि नोटा छापण्याचा खर्च देखील वाचेल. याचा फायदा सामान्यांना देखील होणार आहे. कारण यामुळे सुरक्षित व्यवहार होतात.


3. खोट्या नोटांवर लगाम


देशात सीमापलीकडून खोट्या नोट्या आणल्या जायच्या. ही एक गंभीर समस्या होती. ज्याच्या हातात या खोट्या नोटा जातात त्यांना याचं नुकसान होतं. सरकारला याला थांबवण्यासाठी देखील मोठी यंत्रणा उभी करावी लागते. नोटबंदीनंतर खोट्या नोटा या चलनात येणार नाही आहेत.


4. रिअल इस्टेट सेक्टर होणार पारदर्शी


नोटबंदीचा सर्वात अधिक फायदा रिअल एस्टेट सेक्टरमध्ये होणार आहे. काळ्या पैशाचा मोठा वापर या सेक्टरमध्ये करण्यात आला होता. यामुळे सरकारला स्टँप ड्यूटीमध्ये मोठं नुकसान होत होतं. सामान्य माणसाला यामुळे घर खरेदी करणं अशक्य होत होतं.


5. काळापैसा संपणार


नोटबंदीनंतर देशात काळ्या पैशाविरोधात सामाजिक बदल आणणं सोपं झालं आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत काळा पैसा तोपर्यंत नाही संपू शकत जो पर्यंत त्यावर सामाजिक क्षेत्रातून विरोध होत नाही. नोटबंदीनंतर काळा पैशावर अकुंश लागला आहे.