नवी दिल्ली : नोटबंदीनंतर देशाच्या कानाकोपऱ्यात काळा पैसा पकडला जातोय. बिहारमध्ये देखील जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये जवळपास 35 लाखांची रोकड पोलिसांनी पकडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गया पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये एका बॅगेत 500 च्या जुन्या नोटा ज्या जवळपास 35 लाखांच्या आहेत. 3 वेगवेगळ्या बॅगेमध्ये या नोटा नेल्या जात होत्या. पण या कोणाच्या आहेत याची माहिती अजून मिळालेली नाही.


पोलिसांनी त्या जप्त केल्या असून चौकशी सुरु केली आहे. हे पैसे सरकारी खात्यात जमा केले आहेत.