नवी दिल्ली : नोटबंदींनंतर लोकांना रोख रक्कम संबंधित अडचणी सहन करावी लागली. अनेकांनी यानंतर देखील नवीन चलन मोठ्या प्रमाणात जमा करुन ठेवला. अनेकांनी काळा पैसा पांढरा देखील करण्याचा प्रयत्न केला. पण आता आरबीआयने यासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅश काउंटरवरुन आता मोठी रक्कम नाही दिली जाणार आहे. नव्या नोटा आता फक्त एटीएममधून मिळणार आहेत. यामुळे नव्या नोटांचा मोठ्या प्रमाणात साठी करणाऱ्यांना आळा बसणार आहे. 


आरबीआयने देशातील सगळ्या मोठ्या शहरांमध्ये ५०० च्या नव्या नोटा पाठवल्या आहेत. पण केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं असं म्हणणं आहे की, काळापैसा जमा करणाऱ्यांची नजर ५०० च्या या नव्या नोटांवर आहे. काळापैसा या नोटांच्या माध्यमातून जमा केला जावू शकतो.


काळापैसा जमा करुन ठेवता येऊ नये म्हणून आता त्याची त्रिस्तरीय चेकिंग होणार आहे. कॅश काऊंटरनंतर बँकेचे दुसरे अधिकारी देखील नजर ठेवून असणार आहेत. मोठी रक्कम हवी असल्यास २००० च्या नोटाच दिल्या जाणार आहेत. ५०० च्या ७५ टक्के नोटा आता एटीएमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. बँक अधिकाऱ्यांशिवाय केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची देखील यावर नजर असणार आहे.