नवी दिल्ली : अघोषित संपत्तीची माहिती देण्याच्या अंतिम तारीख आता संपत आली आहे. ३१ मार्चला दिलेली सवलत संपणार आहे. आयकर विभागाने शुक्रवारी काळापैसा बाळगणाऱ्या लोकांना शेवटचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार '३१ मार्च, २०१७ पर्यंत वाट बघू नका. तुमच्या बेहिशोबी मालमत्ता घोषित करा नाही तर मग दंड भरा. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत बेहिशोबी मालमत्ता रोख रक्कमेच्या रुपात बँक किंवा डाकघरमध्ये जाऊन खात्यामध्ये जमा करा. ज्यावर टॅक्स आणि दंडासह एकूण 49.90% भरावे लागतील.


आयकर विभागाने या योजनेअंतर्गत अशा लोकांची नावे गुप्त ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान गरीब योजनेत २५ टक्के रक्कम ठेवली जाईल. यावर कोणतंही व्याज मिळणार नाही. चार वर्ष ही रक्कम लॉक-इन रुपात ठेवली जाईल. त्यानंतर ती वापरता येईल. पण जे खुलासा नाही करणार त्यांच्याकडून 77.25% टक्के दंड वसूल केला जाईल.