छत्तीसगड : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाच्या साहाय्यानं हा हल्ला केला. 


दंतेवाडापासून 12 किलोमीटवर असलेल्या मेलवाड सीआरपीएफचे जवान आपल्या गाडीतून जात असताना भीषण स्फोट घडला. या स्फोटाची तिव्रता एवढी होती की स्फोट झाल्यानंतर जावानांची गाडी फुटबॉलसारखी हवेत उडाली. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे.