जयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 77 जणांचा मृत्यू
जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू शोकसागरात बुडालंय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात आत्तापर्यंत 77 जणांचा मृत्यू झालायं. त्यात कोईमतूर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
चेन्नई : जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू शोकसागरात बुडालंय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात आत्तापर्यंत 77 जणांचा मृत्यू झालायं. त्यात कोईमतूर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
एआयडीएमके मृतांच्या वारसांना तीन लाखांची मदत देणार आहे. कोईंबतूर जिल्ह्यातील सिंगनल्लूर येथील 65 वर्षीय व्यक्तीला वृत्तवाहिनीवरच्या बातम्या पहात असतानाच धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुस-या एका घटनेतही 62 वर्षीय महिलेला धक्का बसून मृत्यू झाला.
एका कामगाराचाही शोक अनावर होऊन त्याचं निधन झालं. कोईंबतून जिल्ह्यातीलच एकानं मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यानं जाळून घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.