लखनऊ : चालत्या बसवर 11000 व्होल्टची विद्युत तार पडल्याने बसमधील 9 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. या घटनेत 18 लोकं गंभीरपणे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


कोतवाली महामार्गावर ही घटना घडली आहे. ही बस दिल्लीहून छिबरामऊ येथे जात होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा जोरदार पाऊस सुरु होता. या घटनेमध्ये तीन महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाला आहे. बस चालक आणि कंडक्टर घटनेनंतर बसमधून बाहेर पडले त्यामुळे त्यांचा जीव वाचला.