तिरुवनंतपुरम : कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे सांगता येणार नाही. केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भीक मागणाऱ्या एका ३५ वर्षीय भिकाऱ्याला तब्बल ६५ लाखांची लॉटरी लागली आहे. दोन वेळेच्या जेवणाची मारामारी असणारा हा भिकारी एका रात्रीत लखपती झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोन्नैया असे नाव असणारा हा भिकारी आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात सुतारकाम करत असे. मात्र एका अपघातात त्याचा पाय गेल्यावर हे काम करणे त्याला अशक्य झाले. त्यानंतर आपल्या पत्नीचं आणि मुलांचं पोषण करण्यासाठी तो भीक मागू लागला. तिरुवनंतपुरमच्या उपनगरात आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तो भीक मागतो. तर एखआद्या बस स्टँडखाली त्याची रात्र घालवतो.


गेली अनेर वर्ष पोन्नैया लॉटरीचं तिकीट काढत होता. पण, इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा नशिबाने त्याला साथ दिली. त्याला लॉटरी लागल्याची सूचना मिळताच आता त्याचे वडील आणि त्याचा भाऊ पुरस्काराची रक्कम घेण्यासाठी आणि पोन्नैयाला घरी घेऊन जाण्यासाठी तिरुवनंतपुरममध्ये आले होते.


काहीच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालहून केरळला आलेल्या एका २२ वर्षीय मजदूरालाही तब्बल एक कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.