कार ड्रायव्हर बनला एका दिवसात २० कोटींचा मालक
लॉटरी लागल्यावर एका रात्रीत कोट्याधीश झाल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू एका रात्रीत लॉटरी न लागता कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ? अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे घडली आहे. एक कार ड्रायव्हर एका दिवसात २० कोटींचा मालक बनला आहे.
जयपूर : लॉटरी लागल्यावर एका रात्रीत कोट्याधीश झाल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू एका रात्रीत लॉटरी न लागता कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ? अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे घडली आहे. एक कार ड्रायव्हर एका दिवसात २० कोटींचा मालक बनला आहे.
जोधपूरमधील एका हिरे व्यापाऱ्याने आपल्या कार ड्रायव्हरच्या बँक खात्यात २० कोटींची रक्कम जमा केली आहे. एवढी रक्कम एकत्र जमा केल्याने आयकर विभागाने ड्रायव्हर नरपतलालला कर जमा करण्यासाठी नोटीस केली. तेव्हा त्या ड्रायव्हरला आपल्या खात्यात २० कोटींची रक्कम जमा असल्याचे कळाले.
या प्रकरणी पीडित ड्रायव्हरने सरदारपूरा पोलिसांकडे काही अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मला याविषयी काहीही माहिती नाही. तसेच पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये असलेल्या या खात्याविषयीही मला माहिती नव्हते, असा कार ड्रायव्हरचा दावा आहे.