पगार 1200 रुपये महिना... पण, करोडोंची संपत्ती जप्त!
एखाद्या व्यक्तीचा पगार अवघा महिना 1200 रुपये आहे... पण, त्याच्याकडून करोडोंची संपत्ती जप्त करण्यात येतेय... तर तोंडात बोटं घालायचीच वेळ नाही का?
मध्यप्रदेश : एखाद्या व्यक्तीचा पगार अवघा महिना 1200 रुपये आहे... पण, त्याच्याकडून करोडोंची संपत्ती जप्त करण्यात येतेय... तर तोंडात बोटं घालायचीच वेळ नाही का?
मध्यप्रदेशच्या सीधी जिल्ह्यातील करौंदिया नावाच्या एक गावात ही घटना उघडकीस आलीय. ग्राम पंचायतीच्या सरकारी राशन दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या सुरेश पांडे याला अटक करण्यात आलीय.
सेल्समन असलेल्या सुरेश पांडे याचा महिन्याचा पगार अवघा 1200 रुपये... पण, त्याच्याविरुद्ध अवैध संपत्ती असल्याची तक्रार लोकायुक्तांना मिळाल्यानंतर त्याच्या घरावर छापा मारण्यात आला. यामध्ये त्याच्या घरातून जवळपास एक करोडोंपेक्षा जास्त संपत्ती जप्त करण्यात आलीय.
या अवैध संपत्तीत सोन्याचे दागिने, डबल बॅरल गन, चार गाड्या आणि कागदी दस्तावेज इत्यादी संपत्तीचा समावेश आहे. पांडेकडे इतकी संपत्ती कुठून आली? याबद्दल लोकायुक्त पोलीस अधिक चौकशी करत आहेत.