मंगळुरू : व्हॉट्सअॅपवरील एक मॅसेज मंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका मुलासाठी महागात पडला आहे. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यानच्या या मॅसेजमुळे त्याला पोलीस स्टेशनची हवा खावी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीनुसार, टी-२० विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान काही विद्यार्थी त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकमेकांशी बोलत होते. तेव्हा त्यातील एका मुलाने 'जय पाकिस्तान' असा मॅसेज व्हॉट्सअॅपवर पोस्ट केला.


ग्रुपमधील एका सदस्याने मात्र त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्याच्या इतर मित्रांना पाठवला. हा स्क्रीनशॉटचा फोटो नंतर परिसरात पसरला आणि कोणीतरी त्याची माहिती पोलिसांना पुरवली.


पोलिसांनी नंतर या मुलांना पोलीस स्टेशनला बोलावले आणि एका करारावर स्वाक्षरी करुन घेतली. पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमीही तपासली. पण, त्यात पोलिसांना कोणतीही आक्षेपार्ह माहिती मिळाली नाही. या मुलाने असा मॅसेज टाकण्यामागे कोणताही वाईट उद्देश नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण संपवले आहे.