नवी दिल्ली :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक सेक्स टेपची सीडी मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी आपल्या सरकारमधील कॅबिनेट दर्जाच्या मंत्री संदीप कुमार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्स सीडी केजरीवाल यांना मिळाली आहे. यात हा मंत्री दोन महिलांसोबत अश्लिल चाळे करताना दिसत आहे. तसेच या सीडीमध्ये काही आपत्तीजनक फोटोही होते. 


यावर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्वतः ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.