पाटणा : बिहारमधल्या इंटरमीडिएट परीक्षेशी निगडीत टॉपर्स घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी दिवाकर प्रसाद याचा संशयास्पद मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी, पाटणाच्या पंचवटी नगरस्थित घरातून पोलीस दिवाकरला अटक करण्यासाठी दाखल झाले होते. याच दरम्यान दिवाकरचा मृत्यू झालाय. पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीनंतर छतावरून कोसळून दिवाकरचा मृत्यू झाला. 


आरोपीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी दिवाकरला माराहण केली त्यानंतर त्याला घराच्या तिसऱ्या मजल्यावरून धक्का दिला... त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटकेच्या भीतीनं पळून जात असताना दिवाकरचा छतावरून कोसळून मृत्यू झाला. 


छतावरून कोसळल्यानंतर दिवाकरच्या मुलानं - विक्रमनं त्याला बहादूरपूर आरओबीनजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी दिवाकरचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहचल्यानंतर दिवाकरच्या शवावर पोस्टमॉर्टेम झालं. 


दिवाकरच्या मुलानं पाच पोलीस अधिकाऱ्यांवर दिवाकरच्या हत्येचा आरोप केलाय.